Join us

‘एबीसीडी-2’मध्येही लॉरेन

By admin | Updated: July 7, 2014 23:09 IST

रेमो डिसुझाच्या ‘एबीसीडी - एनी बडी कॅन डान्स’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अमेरिकन डान्सर लॉरेन गॉतलिब ‘एबीसीडी-2’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रेमो डिसुझाच्या ‘एबीसीडी - एनी बडी कॅन डान्स’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अमेरिकन डान्सर लॉरेन गॉतलिब ‘एबीसीडी-2’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात लॉरेनसोबत वरुण धवन आणि श्रद्धा कपूरही मुख्य भूमिकेत दिसतील. ‘एबीसीडी’मध्ये प्रभुदेवाने नृत्य प्रशिक्षक विष्णूची भूमिका निभावली होती. याही चित्रपटात तो हेच पात्र साकारताना दिसेल. चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण असून श्रद्धा, वरुण आणि लॉरेन यांच्यावर दहा डान्स साँग्स शूट केले जाणार आहेत. याबाबत सांगताना लॉरेन म्हणते की,‘मी या प्रोजेक्टमुळे खूप उत्साहित आहे. ‘एबीसीडी’मध्ये काम करताना रेमो सरांसोबतचा अनुभव चांगला होता. एबीसीडीप्रमाणोच ‘एबीसीडी-2’ ही हिट ठरावा अशी माझी अपेक्षा आहे.