Join us

'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यास कुमार विश्वासना ५ कोटींची ऑफर

By admin | Updated: July 22, 2014 11:43 IST

आम आदमी पक्षाचे(आप)नेते कुमार विश्वास यांना 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २२ - अमेठीतून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीविरोधात निवडणूक लढवणारे आम आदमी पक्षाचे(आप) नेते कुमार विश्वास यांना निवडणुकीत भलेही पराभव पत्करावा लागला असला तरी ते वेगळ्या क्षेत्रात उंची गाठताना दिसत आहेत. एकीकडे विश्वास यांना 'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. एवढेच नव्हे तर विश्वास आता गूगलच्या सिलिकॉन व्हॅलीतील मुख्यालयातील कर्मचा-यांशी संवाद साधणार आहेत. तसेच कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतही ते राजकारणावर लेक्चर देणार आहेत. 
'बिग बॉस' निर्मिती करणा-या एंडेमॉल कंपनीने विश्वास यांना या शोमध्ये सहभागी होण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. यावरून विश्वास यांची लोकप्रियता आणि सेलिब्रिटी स्टेटस भलतेच वाढल्याचे चित्र दिसत आहे. राजकारणी असलेले कुमार विश्वास हे लवकरच बॉलिव़ूमध्येही एंट्री घेणार असल्याची चर्चा आहे. गीतकार म्हणून ते आपले नशीब आजमावणार असून त्यांच्या गीताला आशा भोसले यांचा स्वरसाज लाभणार आहे.