Join us

किसिंगचा हेडमास्तर

By admin | Updated: July 21, 2014 14:52 IST

आगामी चित्रपट राजा ‘नटवरलाल’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी इमरान हाश्मी आपल्या सिरियल किसरच्या इमेजवर मनमोकळेपणाने बोलला.

आगामी चित्रपट राजा ‘नटवरलाल’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी इमरान हाश्मी आपल्या सिरियल किसरच्या इमेजवर मनमोकळेपणाने बोलला. इमरानला विचारण्यात आले, की किसिंगमध्ये तुझी कझन आलिया भट्ट आणि इतर स्टार तुला टक्कर देत आहेत. त्यावर त्याचे उत्तर असे होते, की ‘मी किसिंग डिपार्टमेंटमध्ये हेडमास्तर आहे, या मुलांना माझी जागा घ्यायला कमीत कमी १0 वर्षे लागतील’. कुणाल देशमुख निर्देशित ‘राजा नटवरलाल’ २९ ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत हुमैमाम मलिक, परेश रावल, केके मैनन आणि दीपक तिजोरी दिसणार आहेत. या किसिंग हेडमास्तरने या चित्रपटात कशी किस दिली आहे, हा एक चर्चेचा विषय बनला आहे.