Join us

कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? वर्षभरानंतर मिळणार उत्तर

By admin | Updated: March 2, 2016 15:30 IST

सर्व चित्रपटप्रेमी आवर्जून वाट पाहत असलेल्या 'बाहुबली 2' च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? हे कोड अखेर उलगडणार आहे.

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २ - सर्व चित्रपटप्रेमी आवर्जून वाट पाहत असलेल्या 'बाहुबली 2' च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? हे कोडं अखेर उलगडणार आहे. बाहुबली चित्रपटाला भरघोस यश मिळालं होतं. अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले होते. सोशल मिडियावर तर कटप्पा आणि बाहुबलीच्या मेसेजेसनी धुमाकूळ घातला होता. फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाच कौतुक करण्यात आलं होतं. त्यानंतर चित्रपटप्रेमी बाहुबलीच्या पुढच्या पार्टची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी ट्विटरवरुन चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. 14 एप्रिल 2017 ला 'बाहुबली 2' रिलीज होत असून याच दिवशी कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? याचं उत्तर सर्वांना मिळेल.