Join us  

करीना बजेटवर बोलणार

By admin | Published: February 26, 2016 2:02 PM

भारतात जवळपास प्रत्येकाचे सोमवारी सादर होणा-या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - भारतात जवळपास प्रत्येकाचे सोमवारी सादर होणा-या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येकालाच काही ना काही अपेक्षा आहेत. २९ फेब्रुवारीला सादर होणा-या या अर्थसंकल्पावर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचेही विशेष लक्ष असणार आहे. 
करीना काही बिझनेस न्यूज चॅनलवर बजेटच्या विषयावर बोलणार असल्याची माहिती आहे. आगामी अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी विचार मांडण्यासाठी करीना प्रचंड उत्सुक्त असल्याचे तिच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.
महिलांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुद केली पाहिजे असे करिनाला वाटते. मुलांच्या शिक्षणालाही प्राधान्य दिले पाहिजे असे तिचे मत आहे. 
हिंदुस्थान टाईम्सने करीनाशी संपर्क साधला तेव्हा तिने यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणसाला लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षण आणि साक्षरतेवर सरकारने जास्त लक्ष द्यावे अशी माझी प्रामाणिक भावना असल्याचे करीनाने सांगितले.