भारतीय क्रिकेटर मोहंमद अजहरुद्दीनवर बनत असलेल्या बायोपिकमध्ये संगीता बिजलानीची भूमिका करिना कपूर निभावणार असल्याची चर्चा आहे. संगीता अजहरुद्दीनची माजी पत्नी आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात इमरान हाश्मी अजहरच्या भूमिकेत दिसेल. विशेष म्हणजे त्याने या भूमिकेच्या तयारीसाठी अजहरकडे ट्रेनिंगही सुरू केले आहे. अद्याप करिनाने या भूमिकेला होकार दिलेला नाही. ती लवकरच चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकणार असल्याचे कळते. त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या संगीता बिजलानी आणि अजहरुद्दीन यांनी 1996 मध्ये लगA केले होते, पण 2क्1क् मध्ये दोघे वेगळे झाले. सलमान खानशी असलेल्या प्रेमसंबंधांमुळेही संगीता चर्चेत असते.