‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान खानसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे़ करीना कपूरचे म्हणणे आहे की, सलमान खानसोबत तिचे चांगले जमते आणि पडद्यावर या दोघांची जोडीदेखील चांगली दिसते़ या अगोदर ही जोडी ‘बॉडीगार्ड’ मध्ये सोबत दिसली होती आणि आता कबीर खानच्या दिग्दर्शनात बनणारा चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे़ करीनाने चित्रपटाविषयी जास्त माहिती सांगितली नाही. तिने सांगितले, की मला चित्रपटाची कथा व माझी भूमिका आवडली आहे़ हा चित्रपट सलमान खानची कंपनी ‘सलमान खान वेंचर्स’द्वारे प्रस्तुत केला जाणार आहे़
करीना-सलमान पुन्हा एकदा एकत्र
By admin | Updated: July 28, 2014 03:20 IST