निर्माता दिग्दर्शक करण जोहर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेमात पडला आहे; पण खऱ्या आयुष्यात नव्हे, तर पडद्यावरील आयुष्यात. करण जौहर ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करीत आहे. या चित्रपटात तो पारसी व्यावसायिक कैजादच्या भूमिकेत आहे. जॅज सिंगर असलेली रोजी म्हणजेच अनुष्का शर्माबद्दल कैजादच्या मनात स्पेशल लव्ह फिलिंग्ज असतात. चित्रपटात करणची निगेटिव्ह भूमिका आहे. अनुराग कश्यपचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २८ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. चित्रपटात रणबीर कपूर आणि रविना टंडनही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
अनुष्काच्या प्रेमात करण जोहर
By admin | Updated: July 31, 2014 23:06 IST