Join us

बाप बनणार करण जोहर

By admin | Updated: June 27, 2014 23:06 IST

करण जोहरने अद्याप लगA केलेले नाही; पण लगAाशिवायच तो बाप बनणार आहे.

करण जोहरने अद्याप लगA केलेले नाही; पण लगAाशिवायच तो बाप बनणार आहे. तो एखादे बाळ वगैरे दत्तक घेत नसून विकास बहलच्या आगामी चित्रपटात एका उपवर मुलाच्या  वडिलांची भूमिका साकारणार आहे. 
चित्रपटात शाहिद मुख्य भूमिकेत असून तो वेडिंग प्लानरच्या भूमिकेत असेल. करण त्याच्या मुलाच्या लगAासाठी वेडिंग प्लानर असलेल्या शाहिद कपूरकडे जातो. करण या भूमिकेसाठी नक्कीच तयार होईल, अशी विकासला आशा आहे. 
सध्या करण दिग्दर्शनात कमी आणि अँकरिंग अभिनयात जास्त वेळ घालवताना दिसतो. टीव्हीवर तो नेहमीच दिसतो; पण आता मोठय़ा पडद्यावरही भूमिका निभावणार आहे. अनुराग कश्यपच्या लवकरच रिलीज होणा:या बाँबे वेल्वेटमध्ये तो विलेनच्या भूमिकेत आहे.