‘बँक चोर’ या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर कपिल शर्माला अब्बास मस्तान यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी साईन केले. आता त्याला आणखी एका चित्रपटात साईन करण्यात आल्याची बातमी आहे. फ्लॉपवर फ्लॉप चित्रपट बनवणाऱ्या रामगोपाल वर्माच्या आगामी चित्रपटात कपिल दिसणार असल्याचे कळते. डार्क लव्ह स्टोरी असलेल्या या चित्रपटात कपिल एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. कपिलसह चित्रपटात आणखी दोन हीरो असणार आहेत. दक्षिण भारतीय कलाकार सिद्धार्थ आणि विनय झंब अशी त्यांची नावं आहेत. अब्बास मस्तान जोडीच्या चित्रपटाचे शूटिंग संपवल्यावर कपिल या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. या बातमीला मात्र अद्याप कपिल किंवा रामगोपाल वर्माकडून दुजोरा मिळालेला नाही.
कपिलला मिळाला दुसरा चित्रपट
By admin | Updated: October 9, 2014 00:38 IST