नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री कंगना राणावत लवकरच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या दोघांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळेल. तलाश चित्रपटाची दिग्दर्शिका रिमा कागतीच्या आगामी चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाची कथा जोया अख्तरची आहे. एकमेकांपेक्षा उलट स्वभाव असलेल्या दोन व्यक्ती प्रेमात पडू शकतात का याचे उत्तर चित्रपटात शोधले जाणार आहे. तसे पाहिले तर ख:या आयुष्यात कंगना आणि सैफ एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. रिमा कागतींचा तलाश बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नव्हता. आता दिग्दर्शिकेला या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत.
कंगना-सैफ दिसणार एकत्र
By admin | Updated: June 23, 2014 23:39 IST