Join us

ब्राझीलच्या सुंदरीसोबत जॉनचा रोमान्स

By admin | Updated: June 20, 2014 23:22 IST

अभिनेता जॉन अब्राहम आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या ‘रॉकी हँडसम’ या आगामी चित्रपटात ब्राङिालियन सुंदरी नॅथलीसोबत रोमान्स करताना दिसेल. ‘

अभिनेता जॉन अब्राहम आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या ‘रॉकी हँडसम’ या आगामी चित्रपटात ब्राङिालियन सुंदरी नॅथलीसोबत रोमान्स करताना दिसेल. ‘द मॅन फ्रॉम नोव्हेअर’ या कोरियन चित्रपटाचा हा रिमेक असेल. नॅथली कौर ही ब्राझीलची मॉडेल व अभिनेत्री आहे. तिचे वडील पंजाबी, तर आई पोतरुगालची रहिवासी आहे. वयाच्या 14 व्या वर्षी नॅथलीने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. रामगोपाल वर्माच्या ‘डिपार्टमेंट’ या चित्रपटात आयटम साँग करून नॅथलीने यापूर्वीच बॉलीवूडमध्ये पर्दापण केले होते. ‘रॉकी हँडसम’ या चित्रपटात जॉन आणि नॅथली यांनी अनेक ‘हॉट सिन्स’ दिले आहेत.