Join us  

जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते २' येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, त्यानेच दिली ही खुशखबरी

By तेजल गावडे | Published: September 21, 2020 8:26 PM

अभिनेता जॉन अब्राहमने 'सत्यमेव जयते २'च्या रिलीज डेटची घोषणा सोशल मीडियावर दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम 'सत्यमेव जयते २' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमसोबत अभिनेत्री दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

जॉन अब्राहनने 'सत्यमेव जयते २' चित्रपटाचा पोस्टर व त्याची रिलीज डेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जॉनने इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करत लिहिले की, ज्या देशाची आई गंगा आहे तिथे रक्तदेखील तिरंगा आहे. सत्यमेव जयते २ सिनेमा १२ मे, २०२१ रोजी ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.  

'सत्यमेव जयते २' चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरीने केले आहे. लॉकडाउनदरम्यान या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सातत्याने काम करत राहिला. पुढील महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. शूटिंगसाठी टीम लखनऊला जाणार आहे. 

जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते'ला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाच्या सीक्वलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पहिल्या भागात भ्रष्टाचाराशी सामना करताना नायक दिसला होता. तर सीक्वलमध्ये नायक पोलिसांपासून राजकीय नेता, उद्योगपती आणि सामान्य माणसापर्यंत सगळीकडे भ्रष्टाचाराविरोधात लढताना दिसणार आहे. दिग्दर्शक मिलापने चित्रपटाच्या कथेत खूप बदल केला आहे. शूटिंग लोकेशनदेखील मुंबई ऐवजी लखनऊ ठरविले आहे.दिग्दर्शक मिलाप झवेरीने सांगितले की, चित्रपटाची कथा लखनऊच्या अवतीभवती फिरते.या चित्रपटात पहिल्या भागापेक्षा जास्त एक्शन सीक्वन्स पहायला मिळणार आहे. 

टॅग्स :जॉन अब्राहमसत्यमेव जयते चित्रपटदिव्या कुमार