ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स पुन्हा एकदा जगभरात सर्वात जास्त कमावणारी अभिनेत्री ठरली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2015 मध्येही तिचेच नाव 'टॉपटेन'च्या यादीत होते.
फोर्ब्सने 2016 मध्ये सर्वांत जास्त कमाई करणा-या अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्कर विजेती जेनिफर लॉरेन्स आहे. दुस-या क्रमांकावर मेलिसा मॅक्कथी आहे. तसेच, विशेष म्हणजे यंदाच्या फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा आहे. यामध्ये दीपिका पादुकोण दहाव्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक कमाई करणा-या 'टॉपटेन' अभिनेत्री खालील प्रमाणे...
1) जेनिफर लॉरेन्स - 46 मिलियन डॉलर्स.
2) मेलिसा मॅक्कर्थी - 33 मिलियन डॉलर्स.
3) स्कार्लेट जोहानसन - 25 मिलियन डॉलर्स.
4) जेनिफर अॅनिस्टन - 21 मिलियन डॉलर्स.
5) फॅन बिंगबिंग - 17 मिलियन डॉलर्स.
6) चार्लिज थेरॉन - 16.5 मिलियन डॉलर्स.
7) अॅमी अॅडम - 13.5 मिलियन डॉलर्स.
8) जुलिया रॉबर्टस - 12 मिलियन डॉलर्स.
9) मिला कुनीस - 11 मिलियन डॉलर्स.
10) दीपिका पादुकोण - 10 मिलियन डॉलर्स.