श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिसने ‘किक’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले आहे. त्याचा फायदाही तिला लगेचच मिळताना दिसतोय. तिला आता हृतिक रोशनसारख्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाची निर्मिती साजीद नादियाडवालाची असणार आहे. किक साईन करतानाच जॅकलीनने नादियाडवालासोबत तीन चित्रपटांचा करार केला होता. किकमुळे जॅकलीनची लॉटरी लागली आहे. सलमानसोबत कास्ट होणार असल्याची बातमी कळताच तिला रणबीर कपूरसोबत रॉय या चित्रपटाची आॅफर मिळाली होती. आता तर हृतिकसोबत काम करण्याची नामी संधी तिला मिळणार आहे.
जॅकलीनला लागली लॉटरी
By admin | Updated: July 31, 2014 05:09 IST