Join us  

#JabHarryMetSejal : "इंटरकोर्स" शब्दावरील सेंसर बोर्डाच्या आक्षेपावर SRKचं स्पष्टीकरण

By admin | Published: June 27, 2017 12:31 PM

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी सिनेमा "जब हॅरी मेट सेजल" रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी सिनेमा "जब हॅरी मेट सेजल"  #JabHarryMetSejal रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. सिनेमाच्या ट्रेलर व्हिडीओमध्ये "इंटरकोर्स" शब्दाचा वापर करण्यात आल्यानं सेंसर बोर्डानं त्यावर आक्षेप नोंदवला आहे. 
यावर अभिनेता शाहरुख खाननं स्पष्टीकरण दिले आहे की, माझा किंवा या सिनेमाशी संबंधीत लोकांचा सिनेमा विकण्यासाठी त्यात अनुचित गोष्टी किंवा अयोग्य शब्द वापरण्याचा हेतू नव्हता.  
 
इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाच्या रिलीज करण्यात आलेल्या एका ट्रेलरमध्ये "इंटरकोर्स"या शब्दावर सेंसर बोर्डाचे अध्यक्ष  पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला आहे. मात्र, निहलानी यांच्या आक्षेपावर लोकांनी टीका करण्यात सुरुवात केल्यानंतर ते म्हणाले की  सर्वसामान्य जनतेनं या शब्दाचं समर्थन करत एक लाखांपर्यंत मतं नोंदवली तर या सिनेमात वापरण्यात आलेल्या "इंटरकोर्स" या शब्दाबाबत तेदेखील सहमत असतील. 
 
या विषयावर किंग खान शाहरुखचं काय म्हणणे असे विचारले असता त्यानं मिश्किल उत्तर  उत्तर दिले की, मला असे वाटते की माझे वय 18 वर्षांहून कमी आहे, त्यामुळे मी माझे मत नोंदू शकत नाही. पुढे तो असंही म्हणाला की, मी आणि सिनेमातील कोणताही सदस्य, इम्तियाज, गीतकार इर्शाद कामिल, प्रितम कोणत्याही प्रकारे अनुचित शब्दाचा वापर करणार नाही, जेणेकरुन एखाद्या परिवाराच्या किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या जातील. अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान यांची मुख्य भूमिका असलेला "जब हॅरी मेट सेजल" सिनेमा  4ऑगस्ट रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.  
 
(बॉलिवूडमध्ये 25 वर्ष झाल्याचा आनंद- शाहरुख खान)
दरम्यान, शाहरुख बॉलिवूडमध्ये आपली  25 वर्ष पूर्ण केली आहेत. याबद्दल सांगताना एसआरके म्हणाला की,  लोकांनी मला एवढी वर्ष प्रेम दिलं त्याबद्दल मी आभारी आहे. ईदनिमित्त मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना शाहरुखनं आपल्या या भावना व्यक्त केल्या.   
 
ईदच्या दिवशी सर्वांना भेटून आनंद होतो. मला पाहण्यासाठी लोक वेगवेगळ्या शहरांतून येतात. बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी होत असल्यानं ब-याचदा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांसह आजूबाजूच्या लोकांना होणा-या त्रासाबाबत मी दिलगीर आहे. ईदच्या निमित्तानं घरात लंच पार्टी ठेवली आहे. तुम्हा सगळ्यांसोबत ईद साजरी करायला आवडते, असंही शाहरुख खान म्हणाला आहे.
 
सलमान खानचा ट्युबलाइट सिनेमा मला खूप आवडला, असं म्हणत शाहरुखनं सलमानचीही स्तुती केली. ईदच्या निमित्तानं शाहरुख खाननं बंगल्याबाहेर आतुरतेने वाट पाहणा-या चाहत्यांना मुलगा अबराम याची ओळख करून दिली. 
यावेळी शाहरुखनं स्वतःच्या मुलीबाबतही मनमोकळ्या गप्पा मारल्या. माझ्या मुलीला अभिनेत्री बनायचं असल्यास तिनं स्वतःचं शिक्षण आधी पूर्ण करावं. कमीत कमी मुलांकडे ग्रॅज्युएशनचीही पदवी तरी असायलाच हवी, असंही शाहरुख खान म्हणाला.