Join us

पडद्यावरचे अदृश्य नायक

By admin | Updated: April 20, 2015 00:00 IST

१९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मेमरीज ऑफ इनव्हिसीबल मॅन या सिनेमाचे कथानकही अदृश्य नायकाभोवतीच फिरत होते. एका अजब घटनेत सिनेमातील ...

१९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मेमरीज ऑफ इनव्हिसीबल मॅन या सिनेमाचे कथानकही अदृश्य नायकाभोवतीच फिरत होते. एका अजब घटनेत सिनेमातील नायक अदृश्य होतो व नंतर त्याच्या मागे गुप्तचर यंत्रणेचा ससेमिरा लागतो असे या चित्रपटाचे कथानक होते.

२००० साली प्रदर्शित झालेला होलो मेन या सिनेमातील नायकाकडेही अदृश्य होण्याची शक्ती होती. यात एक शास्त्रज्ञ स्वतःला अदृश्य करुन घेतो व नंतर हत्येचे सत्र सुरु करतो असे या चित्रपटाचे कथानक होते.

हॉलीवूडमध्ये अदृश्य नायकावर आधारित चित्रपट काढण्याची परंपरा अगोदरपासून होती. १९५१ मध्ये प्रदर्शित झालेला अ‍ॅबोट व कॉस्टेलो मीट द इनव्हिसीबल मॅन हा कॉमेडी व थ्रिलरचा तडका असलेला चित्रपटातील नायकही अदृश्य होतो. या नायकावर हत्येचा आरोप असतो पण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तो अदृश्य होण्याची इंजेक्शन घेतो. पण मृत्यू झाल्याशिवाय त्याला पुन्हा व्हिसीबल होणे अशक्य असते. हा चित्रपट त्याकाळीही चांगलाच चालला होता.

अदृश्य नायकांवर आधारित गाजलेला चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया. अनिल कपूर व श्रीदेवी दमदार अभिनय अमरीश पुरी यांनी साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. १९८७ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अमरीश पुरी यांच्या कठोर आवाजातील मॉगेंबो खुश हुआ हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

अभिनेता तुषार कपूर व अंतरा माळी या दोघांचा गायब हा चित्रपट १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. सुमार कथा आणि तितकाच सुमार अभिनय असल्याने प्रेक्षकही सिनेमागृहातून गायब झाले.

इम्रान हाश्मी व अमायरा दस्तूर यांची प्रमुख भूमिका असलेला मि. एक्स हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटातील नायकाकडे गायब होण्याची शक्ती असून याच शक्तीच्या आधारे तो अन्याय करणा-यांचा कसा सूड घेतो यावर चित्रपटाचे कथानक आहे. भूत किंवा आत्मा नसलेला पण जीवंतपणीच अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त झालेल्या नायकांवर आधारित बॉलीवूडमधील चित्रपटांची एक झलक...