आपल्या बेजोड अॅक्टींगमुळे समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोघांचे मन जिंकणारा नवाजुद्दीन सिद्दिकी मात्र स्वत:ला अजून यशस्वी मानत नाही. नुकत्याच त्याच्या ‘बजरंगी भाईजान’ने बॉक्स आॅफिसवर ३०० कोटींचा आकडा पार केला. त्याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणतो की, ‘यामुळे माझ्यात काहीच बदल झाला नाही. मी जसा होतो तसाच आहे. हं...मात्र लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदललेला आहे. मला वेगवेगळे रोल स्वीकारायला आवडते बस्स.’ येत्या २१ आॅगस्ट रोजी त्याचा केतन मेहता दिग्दर्शित ‘मांझी’ चित्रपट रीलिज होत आहे. दशरथ मांझी या खऱ्या माणसाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. मांझीने केवळ हाथोड्याच्या साहाय्याने सलग २२ वर्षे डोंगर फोडून रस्ता बनविला होता.
मी अजून यशस्वी नाही
By admin | Updated: August 12, 2015 05:18 IST