Join us  

‘मी जीवावर उदार झालो आहे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 2:42 AM

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर आपल्या चित्रपटाशिवाय त्याच्या लाईम लाईट व खाजगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत येतो.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर आपल्या चित्रपटाशिवाय त्याच्या लाईम लाईट व खाजगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत येतो. करण जोहरने आपल्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टींचा खुलासा करताना मी जीवावर उदार झालो असल्याचे सांगितले आहे. करण जोहरने ‘आस्क मी एनीथिंग’ या हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्याच्या चाहत्यांनी देखील त्याची उत्सुकता वाढविणारे प्रश्न विचारले. याची त्याने मजेदार उत्तरेही दिली. ‘काफी विद करण’ या शोच्या संदर्भात एका यूजरने करणला तुला चहा आवडतो की कॉफी असा प्रश्न केला. यावर करणने मजेदार उत्तर दिले. करण म्हणाला, ‘‘हा अप्रतिम प्रश्न आहे, मला एका थोडा वेळ द्या, टाळ्या व्हायलाच हव्या’’. कोणता चित्रपट तुला आवडला मात्र तू दिग्दर्शित करू शकला नाहीस या प्रश्नावर करणने आमिर खानच्या ‘दंगल’चे नाव घेतले. तुला पैसा, प्रेम की प्रसिद्धी काय आवडते या प्रश्नावर करण म्हणाला, ‘‘प्रसिद्धी तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकते आणि प्रेमाला दुसरा पर्याय नाही कधी कधी प्रेम तुमच्यासाठी ऊत्तर ठरू शकते.’’ नंदिनी नामक एका यूजरने तुझे रिलेशनशीप स्टेटस काय? असा सवाल केला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल करण म्हणाला, एकटा, उपलब्ध आणि जीवावर उदार झालेला...(सिंगल, अव्हेलेबल, बॉर्डरलाईन डेस्पिरेट) असे उत्तर दिले. तुला कोणत्या गोष्टीचा राग येतो या प्रश्नाच्या उत्तर देताना ‘‘जे लोक द्वेश करतात त्यांचा मी घृणा करतो.’’ असे उत्तर दिले. तू आत्मचरित्राचे नाव ‘अनसुटेबल बॉय’ असे का ठेवले या प्रश्नच्या उत्तरात करण म्हणाला, कारण मी सुटेबल आहे. एकाने तुझा वॉट्सअ‍ॅप नंबर दे असा प्रश्न केला यावर त्याने ‘‘नक्कीच, तुला माझा बॅक अकाऊंट नंबर नकोच असेल’’ असा टोला लगावला.