‘देव डी’ आणि ‘साहिब बीवी और गँगस्टर’सारख्या चित्रपटांमध्ये सशक्त अभिनय करणारी अभिनेत्री माही गिलने तिच्या करिअरबाबत एक वेगळाच खुलासा केला आहे. माही म्हणाली की, ‘मला कधीच अभिनेत्री बनण्याची इच्छा नव्हती, पण मी देवाचे आभार मानते कारण मी जे काही करते आहे त्याबद्दल मला नेहमीच प्रशंसा मिळाली आहे. मी तर फक्त या चंदेरी दुनियेत येण्याची हिंमत केली. माही सध्या ‘कॅरी आॅन जट्टा-२’च्या चित्रीकरणात ती बिझी आहे. प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळे करण्याची इच्छा असल्याने भूमिकाही विचार करून निवडत असल्याचे माही म्हणाली.
मला अभिनेत्री बनायचे नव्हते
By admin | Updated: June 20, 2014 11:00 IST