Join us

सलमानच्या बहिणीशी लगA करतोय पुलकित

By admin | Updated: June 26, 2014 22:41 IST

‘फुकरे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता पुलकित सम्राट लवकरच विवाहबद्ध होत आहे.

‘फुकरे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता पुलकित सम्राट लवकरच विवाहबद्ध होत आहे. सलमानची मानलेली बहीण असलेल्या श्वेता रोहिरासोबत नोव्हेंबर महिन्यात पुलकित लग्नगाठ बांधणार आहे. हे लग्न गोव्यात होणार असून सलमानचे संपूर्ण कुटुंबीय या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पुलकितने ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत काम केले आहे. ‘बिट्ट बॉस’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सलमानला सहभागी झालेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते; पण त्याचे कारण आता सर्वाच्या लक्षात आले आहे. पुलकितच्या ‘ओ तेरी’ या चित्रपटातही सलमानची झलक दिसली होती. श्वेता आणि पुलकित यांची ओळख झाली तेव्हा श्वेता पत्रकार होती.