शंभर कोटी क्लबमध्ये जाणारे चित्रपट म्हणजे ‘हिट अँड रन’ असल्याचे आपण समजतो, असे अभिनेता अजय देवगण याने सांगितले. आजकाल बिग बजेट चित्रपटांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय केला म्हणजे तो चित्रपट चांगला असल्याचे समजू नये. चित्रपट बनविण्यासाठी मोठा खर्च केल्याने अशा चित्रपटांच्या निर्मात्यांनाही जास्तीचा नफा होत नाही. तसेच कलावंतांनाही फारसा फायदा होत नाही. बजेटच्या तुलनेत अधिक नफा कमविणारे चित्रपट म्हणजेच हिट चित्रपट असल्याचे आपण मानतो, असेही अजयने स्पष्ट केले.
शंभर कोटी क्लब म्हणजे ‘हिट अँड रन’
By admin | Updated: December 15, 2014 00:13 IST