Join us  

कितने प्यारे रिश्ते है ये...

By admin | Published: April 18, 2017 11:34 PM

‘‘कितने अजीब रिश्ते है यहाँ पे’’ बॉलिवूडमधल्या क्षणिक नात्यांचं वर्णन करणारं पेज थ्री सिनेमातलं हे गाणं.

- सुवर्णा जैन‘‘कितने अजीब रिश्ते है यहाँ पे’’ बॉलिवूडमधल्या क्षणिक नात्यांचं वर्णन करणारं पेज थ्री सिनेमातलं हे गाणं. मात्र बॉलिवूडमधील बहुतांशी कलाकारांचे एकमेंकांशी काही ना काही नातं आहे. यातील बऱ्याच कलाकार मंडळींचं एकमेकांशी गहिरे नातेसंबंध आहेत. या कलाकारांच्या या नात्याबद्दल रसिकांनाही फारशी माहिती नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत बॉलिवूडच्या या कलाकारांचे एकमेकांशी असलेले नाते. अमिताभ बच्चन - राजीव वर्माबिग बी अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन यांची बहिण रिटा बहादुरी यांचे पती म्हणजेच अभिनेता राजीव वर्मा. या नात्यानुसार बिग बी आणि राजीव वर्मा एकमेकांचे साडू झालेत. आलिया भट्ट - इम्रान हाश्मीअभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री आलिया भट्ट एकमेकांचे मावस भावंडं आहेत. या नात्यामुळेच इम्रानने आलिया भट्टसोबत सिनेमा साईन करण्यास नकार दिला होता. आपल्या बहिणीसह रोमँटिक भूमिका कसा साकारु असा सवालइम्रानने उपस्थित केला होता. मिथुन चक्रवर्ती - करीना कपूरबॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेता शम्मी कपूर यांची पहिली पत्नी गीता बाली यांची बहिण म्हणजे योगिता बाली. योगिता बाली यांचं लग्न अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्याशी झालं. या नात्यामुळे मिथुन हे कपूर खानदानचे जावई झालेत. तर अभिनेत्री करीना कपूरचे मावशे म्हणावे लागतील.आमिर खान - अदिती राव हैदरीमिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांच्यात असंच काहीसं नातं आहे. अदिती ही आमिरची पत्नी किरण रावची चुलत बहिण आहे. या नात्यामुळे अदिती आमिरची मेहुणी आहे.शर्मन जोशी - प्रेम चोप्राबॉलीवुडचा अभिनेता शमर््ान जोशी आणि बॉलीवुडचे प्रसिद्ध खलनायक तसेच ज्येष्ठ अभिनेता प्रेम चोप्रा यांच्यातही वेगळं नातं आहे. शर्मन हा प्रेम चोप्रा यांचा जावई आहे.सोनम कपूर - रणवीर सिंहसोनम कपूर आणि रणवीर सिंह यांच्यात भावाबहिणीचं नातं आहे. कारण सोनम कपूरची आजी रणवीर सिंहच्या आजोबांची सख्खी बहिण आहे.