Join us

हनी सिंहसोबत गौहर बनणार होस्ट

By admin | Updated: June 21, 2014 22:51 IST

यो यो हनी सिंहच्या इंडियाज रॉ स्टार या रिअॅलिटी शोसाठी होस्टचा शोध आता संपला आहे.

यो यो हनी सिंहच्या इंडियाज रॉ स्टार या रिअॅलिटी शोसाठी होस्टचा शोध आता संपला आहे. मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याची बातमी आहे. गौहर खानची निवड स्वत: हनी सिंहने केल्याचे सांगण्यात येत आहे. हनी सिंहला जेव्हा माहीत झाले की, गौहर इंटरनेटवरील सर्वात जास्त सर्च केली गेलेली सेलिब्रिटी आहे, तेव्हा त्याने गौहरला शोसाठी निवडले. इंडियाज रॉ स्टार हा शो लवकरच प्रसारित केला जाणार आहे. हनी सिंह या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.