Join us

‘हेट स्टोरी- २’ ठरली हिट

By admin | Updated: July 21, 2014 14:52 IST

‘हेट स्टोरी- २’ चित्रपटाने जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाची साडेपाच कोटींची कमाई झाली.

‘हेट स्टोरी- २’ चित्रपटाने जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाची साडेपाच कोटींची कमाई झाली. जय भानुशाली आणि सुरवीन चावला यासारख्या नवीन कलाकारांच्या ‘हेट स्टोरी- २’ने बॉक्स ऑफिसवर ओपनिंग केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५.४६ कोटींची कमाई केल्यामुळे चित्रपट ट्रेड अनॉलिस्ट परेशान झाले आहे. नवीन कलाकारांनी सजलेल्या या कमी बजटच्या चित्रपटाने चांगलीच मजल गाठली. विशाल पांड्या दिग्दर्शित हा चित्रपट २0१२ मध्ये आलेल्या ‘हेट स्टोरी’चा सिक्वल आहे. हेट स्टोरीनेदेखील चांगली कमाई केली होती. अनॉलिस्टचे म्हणणे आहे, की ‘हेट स्टोरी- २’ या आठवड्यात किमान २0 कोटींची कमाई करेल.