Join us

हेमामालिनी- रकुलच्या प्रेमात राजकुमार

By admin | Updated: August 1, 2014 23:51 IST

बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता राजकुमार राव त्याच्या आगामी चित्रपटात ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि रकुल प्रीत या दोघींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे

बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता राजकुमार राव त्याच्या आगामी चित्रपटात ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि रकुल प्रीत या दोघींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दिग्दर्शक रमेश शिप्पी यांच्या शिमला मिर्च या चित्रपटात हे प्रेमाचे त्रिकुट पाहायला मिळणार आहे. हेमामालिनी यांच्यासोबत काम करायची संधी मिळाल्याने राजकुमार खुश आहे. राजकुमारच्या मते, शिमला मिर्च हा वेगळा चित्रपट आहे. ही एक रोमँटिक कॉमेडी आहे. हेमामालिनी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखेच आहे. या चित्रपटासाठी मला वजन वाढवायला सांगण्यात आले आहे. मी त्यासाठी मेहनत घेतोय.’ शिमला मिर्च हा चित्रपट एका अशा तरुणाची कहाणी आहे, जो आईसह तिच्या मुलीवरही प्रेम करू लागतो. या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. चित्रपटात आईच्या भूमिकेत हेमामालिनी, तर मुलीच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंह आहे.