ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - अभिनेत्री क्रिती सेनन हिने सुरुवातीला डबिंग चित्रपटाबाबत तिरस्कार केला होता. मात्र आता तिनेच डबिंगचा आनंद घेण्यास सुरुवात केली आहे.
बॉलीवूडमध्ये 'हिरोपंती' या चित्रपटाने पदार्पण करणा-या अभिनेत्री क्रिती सेनन हिने आपल्या आगामी चित्रपटाबाबत एक ट्विट केले आहे. तिचा 'राबता' हा आगामी डबिंग चित्रपट लवकरच येणार आहे. डबिंग म्हणजे संपूर्ण चित्रपट हा एका लहानशा शांत रुममध्ये प्रत्येकाच्या भावना पुन्हा जागृत करण्यासारखा आहे. याचा तिरस्कार आहे. दरम्यान, याचा आता आनंद घेण्यास सुरुवात केली आहे, असे क्रिती सेनन ट्विट केले आहे.
आगामी 'राबता' या चित्रपटात क्रिती सेनन हिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत सुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 9 जूनला प्रदर्शित होईल.