Join us  

ही मैत्री तुटायची न्हाय!

By admin | Published: April 18, 2017 11:36 PM

दोन अभिनेत्री एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असूच शकत नाही असे म्हटले जाते. पण यासाठी मराठीतील दोन अभिनेत्री अपवाद ठरल्या आहेत

दोन अभिनेत्री एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असूच शकत नाही असे म्हटले जाते. पण यासाठी मराठीतील दोन अभिनेत्री अपवाद ठरल्या आहेत. छोट्या पडद्यावर आपले नाव गाजवणाऱ्या दोन अभिनेत्री या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तेजश्री आणि सुरुची कोणत्याही चित्रपट, मालिका अथवा नाटकात कधीही एकत्र झळकल्या नसल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या एकमेकांच्या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींची मैत्री ही अनेक वर्षांपासूनची आहे. सुरुची आणि तेजश्री नेहमीच एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. या फोटोंमधूनच या दोघींच्या मैत्रीबद्दल त्यांच्या फॅन्सना कळते. तेजश्रीने नुकताच सुरुचीसोबतचा एक फोटो पोस्ट करून त्यावर या फोटोला कॅप्शनची गरज आहे का? असे सुरुचीला विचारले आहे. हा फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तेजश्री आणि सुरुची दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत.