दिग्दर्शक साई कबीरने त्याच्या ‘डिव्हाईन लव्हर्स’ या चित्रपटाची स्क्रीप्ट फ्रान्सला पाठवली होती. आता बातमी आहे, फ्रेंच फिल्म कमिशनने त्याच्या या प्रोजेक्टला हिरवा ङोंडा दाखवला आहे. कंगना राणावत आणि इरफान खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक इंडो-फ्रेंच कथा आहे. फ्रेंच फिल्म कमिशनचे फ्रँक प्रियोट यांनी स्क्रीप्टसाठी कबीरला मार्गदर्शन केले आहे, त्याशिवाय या चित्रपटासाठी युरोपात सहनिर्माता शोधण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. कबीरने सांगितले की, निर्माता लियोनादरे ग्सोविस्की डिव्हाईन लव्हर्स फ्रान्समध्ये रिलीज करण्यासाठीही त्यांची मदत होणार आहे.