Join us  

पितापुत्रांचा रंगतदार सामना!

By admin | Published: October 24, 2015 2:37 AM

स्वातंत्र्यपूर्व काळातच हिंदी चित्रपटसृष्टीची बीजे रोवली गेली होेती. दर्जेदार कलावंत आणि पडद्यामागचे गुणी तंत्रज्ञ यांचे खतपाणी, रसिकांची भरभरून मिळणारी दाद यामुळे हे रोपटे

स्वातंत्र्यपूर्व काळातच हिंदी चित्रपटसृष्टीची बीजे रोवली गेली होेती. दर्जेदार कलावंत आणि पडद्यामागचे गुणी तंत्रज्ञ यांचे खतपाणी, रसिकांची भरभरून मिळणारी दाद यामुळे हे रोपटे फुलू लागले. पहिली पिढी अस्ताला जाऊन दुसरी पिढी उदयाला आली, कधी काळी आपल्या वडिलांचे बोट धरून शूटिंगच्या सेटवर येणारी ही लहान मंडळी आता वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चक्क त्यांच्या बरोबरीने रुपेरी पडद्यावर झळकायला लागली आहेत. अनेक वर्षांचा अभिनयाचा अनुभव गाठीशी बांधलेल्या आपल्या वडिलांसोबत काम करत असताना काय येत असेल या तरुण पिढीच्या मनात? वडिलांसोबत काम करण्याचा आनंद? की नकळत होणाऱ्या तुलनेचे टेन्शन? मुलासोबत काम करणारा तो अभिनेत्यामधला ‘बाप’ मात्र मुलाच्या दमदार पदार्पणाने नक्कीच सुुखावून जात असणार. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शानदार’मध्ये शाहिद-पंकज कपूर या पितापुत्राच्या जोडीनेही पहिल्यांदाच एकत्र काम केले. चला तर मग भेटूया अशा पिता-पुत्रांना ज्यांनी केला आहे रुपेरी पडद्यावर एकमेकांचा आमना-सामना !!!शाहिद-पंकज कपूरपहिल्यांदाच एकत्र काम करणाऱ्या या जोडीचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. या अनुभवाबाबत बोलताना शाहिद म्हणाला, ‘डॅड किती दर्जेदार अभिनेते आहेत हे तर आपण सगळेच जाणतो. त्यांच्यासोबत काम करताना सुरुवातीला प्रचंड दडपण आले होते. त्यांच्यासमोर १०० पैकी ५ जणांनी जरी माझे कौतुक केले तरी मी स्वत:ला धन्य समजेन. त्यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये चमकणे हा माझ्यासाठी सुखाचा परमोच्च बिंदू आहे.’ त्याला दडपणामुळे या दोघांचा पहिला शॉट ओके करताना ४-५ रिटेक घ्यावे लागले.अभिषेक-अमिताभ बच्चनया पिता-पुत्रांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ‘पा’ ,‘कभी अलविदा ना कहेना’, ‘सरकार राज’, ‘बंटी और बबली’ यासारखे अनेक हिट चित्रपट या जोडीने दिले. ऐश्वर्यासोबतचे त्यांचे ‘कजरारे कजरारे’ हे गाणेही तुफान गाजले. यानंतर न्यृत्यकौशल्याबाबत दोघांमध्ये झालेली तुलनाही अनेक महिने गाजली होती.ऋषी-राज कपूर‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात ऋषी कपूरने राज यांची लहानपणाची भूमिका केली होती. नवखा ऋषी आणि शो मॅन राज कपूर अशी तुलनाही झाली. वडिलांकडे बघतच आपण अभिनय शिकल्याचे ऋषी कबूल करतो.रणबीर-ऋषी कपूर ‘बेशरम’ चित्रपटात या पितापुत्रांनी आणि नीतू सिंग यांनी काम केले. रणबीरचे मनापासून कौतुक करताना ऋषी म्हणाला की, ‘आम्ही सगळेच एकत्र असल्यामुळे सेटवर घरच्यासारखे वातावरण होते. लाडक्या मुलाचा अभिनय इतक्या जवळून पाहताना मी मनोमन सुखावून गेलो.’ सूरज-आदित्य पांचोली : ‘हीरो’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सूरजला पहिल्याच चित्रपटात वडिलांसोबत स्क्रीन शेअर करण्याची नामी संधी मिळाली. सूरज म्हणाला, ‘शूटिंगला अवघे दोन दिवस राहिले असताना मला पप्पासुद्धा चित्रपटात असणार आहेत, हे समजले व माझे हातपायच गळून गेले. पण तरीही त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अमेझिंग होता.’सनी-धर्मेंद्र देओल : ‘यमला पगला दिवाना’, ‘अपने’, ‘दिल्लगी’ हे या जोडीचे गाजलेले चित्रपट. सनी सध्या त्याचा सुपरहिट चित्रपट ‘घायल’चा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: सनी करणार असून निर्मिती धर्मेंद्र करणार आहे. मात्र यात धर्मेंद्र अभिनय करणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नसून तसे झाल्यास या दोघांचा डबल धमाका पुन्हा एकदा अनुभवायची संधी मिळेल.संजय-सुनील दत्त : मुन्नाभाई एमबीबीएस हा या जोडीचा गाजलेला चित्रपट. या चित्रपटात मुलाच्या यशाचे कौतुक वाटणारा, मुलाबद्दल क्षणात हळवा होणारा, सत्य कळाल्यावर कठोर होणारा अशा वडिलांच्या अनेक छटा सुनील दत्त यांनी खुबीने साकारल्या होत्या. वडिलांसोबत काम करताना संजूबाबानेही त्याचे पात्र मोठ्या ताकदीने साकारले होते.