Join us  

एक्सक्लुझिव्ह - बेगानी शादीमें रणबीर दिवाना !

By admin | Published: June 14, 2016 2:47 PM

मुंबईतील एका नाईटक्लबमध्ये पार्टी करणा-या रणबीरने एका मुलीच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावत तिला अनोखे गिफ्ट दिले.

सीएनएक्स एक्सक्लुझिव्ह
मुंबई, दि. १४ - कतरिना कैफशी झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूर सध्या कामात बराच व्यस्त राहू लागला आहे. मात्र कामाच्या व्यापातून वेळ काढून नुकताच तो मित्रांसोबत मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याची चार-पाच मित्रांसोबत मस्त धमालमस्ती सुरू होती. मजा-मस्ती करत असतानाच त्याच पबमध्ये एका मुलीचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे त्याच्या लक्षात आले.
 
शेफाली मेहता ही त्याच पबमध्ये तिच्या मित्रमैत्रिणींसोबत हा खास दिवस साजरा करत होती. एरवी मीडियाशी फटकून वागणारा रणबीर त्या वेळेस मात्र स्वत: त्या मुलीजवळ गेला आणि त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला. त्यामुळे शेफालीला न मागताच वाढदिवसाचे मस्त गिफ्ट मिळाले.