Join us  

...यांचे जगभरात डाय हार्ट फॅन्स!

By admin | Published: June 26, 2017 1:19 AM

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत कमाईच्या बाबतीत नवा कीर्तीमान रचला.

Satish Dongareकाही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत कमाईच्या बाबतीत नवा कीर्तीमान रचला. त्यामुळे या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केले जातील काय? याविषयी साशंकता निर्माण केली जात असतानाच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ने चीनमध्ये एकच धूम ठोकत ‘बाहुबली २’ला कमाईच्या बाबतीत धोबीपछाड दिली. आमिरने विदेशात मारलेली बाजी अनेकांच्या भुवया उंचविणारी असली तरी, त्याची विदेशातील लोकप्रियता अधोरेखित करणारी आहे. चिनी चाहते तर आमिरच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले असून, चक्क त्याच्या होर्डिंग्जसमोर सेल्फी घेताना बघावयास मिळत आहेत. आमिरप्रमाणेच बॉलिवूडमधील आणखी काही स्टार्स आहे, ज्यांचे फॅन फॉलोर्इंग जगातील कानाकोपऱ्यात आहे. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...अमिताभ बच्चन जर तुम्हाला महानायक अमिताभ बच्चन यांचे भारताबाहेरील डाय हार्ट फॅन बघायचे असतील तर तुम्हाला इजिप्तला जावे लागेल. कारण तेथील लोक कोणाही भारतीयाला बघितले तरी त्याच्यात अमिताभ बच्चन यांना शोधतात. त्यांच्याकडे अमिताभविषयी आपुलकीने विचारतात. मध्यंतरीच्या काळात तर असे ऐकण्यात आले होते की, जेव्हा अमिताभ इजिप्तच्या विमानतळावर उतरले होते तेव्हा तेथील फॅन्सनी त्यांना अक्षरश: घेराव घातला होता. फॅन्सच्या गराड्यातून बाहेर पडणे अमिताभ यांना मुश्कील झाले होते. ऐश्वर्या राय-बच्चनआपल्या सौंदर्याने जगाला मोहिनी घालणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे जगभरात फॅन्स बघावयास मिळतील. तब्बल १५ वर्षे कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या ऐशच्या चित्रपटांना पसंती देणारा चाहता जगातल्या कानाकोपऱ्यात आहे. शाहरूख खानबॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचाही चाहतावर्ग तर जगाच्या कानाकोपऱ्यात बघावयास मिळेल. त्यातही जर्मनी आणि कोरियामध्ये शाहरूख प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शाहरूखचे चित्रपट भारताबरोबरच विदेशातही चांगली कमाई करतात. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘चक दे इंडिया’, ‘देवदास’ या चित्रपटांनी भारताबाहेर चांगला गल्ला जमविला आहे. काही भागात तर आजही हे चित्रपट बघितले जातात. राज कपूरराज कपूर यांचा कोणी फॅन नसेल, असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण जगाच्या कानाकोपऱ्यात राज कपूर यांचा चाहतावर्ग आहे. एकेकाळी रशियन चाहते तर त्यांच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले होते. त्यामुळेच की काय, एकदा त्यांना व्हीजा न घेताच रशियात बोलावले होते. त्यावेळी त्यांना रशियन चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते. शम्मी कपूरआपल्या आगळ्यावेगळ्या अभिनय शैलीने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचे चाहते आजही जगाच्या कानाकोपऱ्यात बघावयास मिळतील. ७०-८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये धूम उडवून देणाऱ्या या अभिनेत्याने भारताबरोबरच विदेशी चाहत्यांनाही आपलेसे केले होते. आपल्या ‘जंगली डान्स’ साठी प्रसिद्ध असणाऱ्या शम्मी कपूर यांच्या याच डान्सची त्यांच्या विदेशी चाहत्यांवर भुरळ पडली होती. मिथुन चक्रवर्तीडिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा बॉलिवूडमध्ये आजही जलवा बघावयास मिळतो. संगीतात भाषेला समजून घेण्याची गरज नाही, ही बाब लोकांना तेव्हा कळाली जेव्हा मिथुनदाचे ‘आय एम अ डिस्को डान्सर’ आणि ‘जिमी जिमी’ हे गाणे रशियामध्ये प्रसिद्ध झाले होते. या दोन गाण्यांनी रशियामधील चाहत्यांना अक्षरश: वेड लावले होते. त्याचबरोबर मिथुनदाने देखील येथील चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आजही रशियामध्ये या गाण्यांचे बोल कानावर पडतात.