सोनम कपूरच्या ‘डॉली की डोली’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ती एका नववधूच्या लूकमध्ये दिसली होती. आता निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज केले असून त्यात सोनमसह तीन अभिनेते राजकुमार राव, पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा हे दिसत आहेत. पुलकित सम्राट चित्रपटात रॉबीन सिंहच्या भूमिकेत आहे, तर राजकुमार रावने सोनू शेरावत आणि वरुणने मनोज सिंह चड्डाची भूमिका साकारली आहे. तिन्ही अभिनेत्यांकडे जस्ट मॅरिडचा बोर्ड आहे. या मोशन पोस्टरवर पण डॉली कोणाची, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. सोनम कपूर सध्या ट्विटरवर तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करीत आहे. तिने ट्विटरवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर पोस्ट केले होते, आता मोशन पोस्टरही पहिल्यांदा तिनेच रिलीज केले आहे.