Join us  

अ‍ॅक्टर्स झाले डॉक्टर!

By admin | Published: October 19, 2015 12:04 AM

इंग्लंडच्या एडीनबर्ग युनिव्हर्सिटीने शाहरुख खानचा मोठाच गौरव केला आहे. त्याला डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे किंग खान आता डॉक्टर शाहरुख खान झाला आहे

इंग्लंडच्या एडीनबर्ग युनिव्हर्सिटीने शाहरुख खानचा मोठाच गौरव केला आहे. त्याला डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे किंग खान आता डॉक्टर शाहरुख खान झाला आहे. किंग खानला दुसऱ्यांदा डॉक्टरेटच्या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०११मध्येही शाहरुखला बैडफोरडशर युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट दिली गेली होती. बॉलीवूडच्या अनेक कलावंतांना या आधीही हा सन्मान लाभला आहे. यात बिग बी अमिताभपासून विद्या बालनपर्यंत अनेकांचा समावेश आहे.>>अमिताभ बच्चन या शतकातील महानायकाला आतापर्यंत देश आणि विदेशातील वेगवेगळ््या युनिव्हर्सिटींद्वारे सहा वेळा या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. २००४ मध्ये प्रथमच बच्चन यांना झांसीच्या युनिव्हर्सिटीकडून हा सन्मान दिला गेला, २००६मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीने त्यांना सन्मानित केले. २००७ मध्ये ब्रिटेनच्या लीडस् मेट्रोपोलिटन युनिव्हर्सिटीने त्यांना ही उपाधी दिली. पहिल्यांदा बच्चन यांना विदेशातील युनिव्हर्सिटीने अशा पद्धतीने गौरविले. २०११मध्ये आस्ट्रेलियाच्या क्विंसलॅण्ड युनिव्हर्सिटीद्वारे बच्चन यांना हा सम्मान मिळाला, तर २०१३मध्ये जोधपूर आणि या वर्षी मिस्रच्या युनिव्हर्सिटीद्वारे अमिताभ यांनी ही पदवी स्वीकारली.>>लता मंगेशकर यांनीदेखील आतापर्यंत सहा वेगवेगळ््या युनिव्हर्सिटीद्वारे हा सम्मान मिळाला आहे. यात बडोद्याची महाराजा शिवाजीराव युनिव्हर्सिटी, पुण्याची शिवाजी युनिव्हर्सिटी, छत्तीसगढची खैरागढ म्युझिक युनिव्हर्सिटी, हैदराबाद युनिव्हर्सिटी आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचा समावेश आहे. याच यादीत शबाना आझमी यांचेदेखील नाव आहे. त्यांना आतापर्यंत पाच वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीद्वारे सन्मानित केले गेले आहे. २००३मध्ये जाधवपूर युनिव्हर्सिटी, २००७मध्ये ब्रिटेनच्या लीडस मेट्रोपोलिटन, २००८मध्ये जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी, २०१३मध्ये सिमोन फ्रासेर युनिव्हर्सिटी आणि २०१४मध्ये उत्तरांचलच्या टिहरी युनिव्हर्सिटीने शबाना आझमी यांना डॉक्टरेटची उपाधी दिली. संगीतातील अनमोल रत्न म्हणून ओळख असलेले संगीतकार ए.आर. रहेमान यांना आतापर्यंत चेन्नईची अण्णा युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेशची अलिगढ युनिव्हर्सिटी, ब्रिटेनची मिडिलसेक्स युनिव्हर्सिटी, स्कॉटलॅण्डची रॉयल कोनसेलवेटोरी युनिव्हर्सिटी आणि बेरक्ली कॉलेज आणि म्युझिक यांच्यावतीने डॉक्टरेटची उपाधी दिली गेली आहे. या दिग्गज्जांसोबतच २००७ मध्ये शिल्पा शेट्टी (युनिव्हर्सिटी आॅफ लीडस्) २००८ मध्ये अक्षय कुमार (विंडसोर युनिव्हर्सिटी)आणि प्रीती झिंटा (युनिव्हर्सिटी आॅफ ईस्ट लंडन) २०१२मध्ये शर्मिला टागोर (एडीनबर्ग युनिव्हर्सिटी) याच वर्षी २०१५मध्ये विद्या बालन (राय युनिव्हर्सिटी)च्या वतीने डॉक्टरेटने गौरविण्यात आले आहे.