Join us  

"दिया और बाती" फेम अभिनेत्रीला पुत्ररत्नाची प्राप्ती

By admin | Published: May 22, 2017 2:38 PM

घराघरामध्ये "संध्या बींदणी" या नावाने ओळखली जाणारी दीपिका सिंग आई झाली आहे. दिया और बाती फेम अभिनेत्री दीपिका सिंग हिने मुलाला जन्म दिला आहे.

ऑनलाईन लोकमत
मुंबई, ता.22- घराघरामध्ये "संध्या बींदणी" या नावाने ओळखली जाणारी दीपिका सिंग आई झाली आहे. दिया और बाती फेम अभिनेत्री दीपिका सिंग हिने मुलाला जन्म दिला आहे. 20 मे रोजी सकाळी 9 वाजता दीपिकाने मुलाला जन्म दिला आहे. दीपिकाचे पती रोहीत राज गोयल यांनी पुत्र प्राप्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला.. रोहीत राज गोयल हे दिया और बाती हम या मालिकेचे दिग्दर्शकही आहेत. "आई आणि मुलगा हे दोघेही छान आहेत. आम्हा दोघांना झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही", अशी माहिती रोहीत राज गोयल यांनी दिली आहे.. दीपिकाला सध्या आराम करायला सांगितले आहे आणि तिला आरामाची गरजही तितकीच आहे, कारण गेले 9 महिने ती खूप कणखर राहीली, असेही रोहीत गोयल पुढे म्हणाले. 
2 मे 2014 मध्ये दीपिका आणि दिया और बाती हम मालिकेचे दिग्दर्शक रोहीत गोयल विवाहबंधनात अडकले होते. यंदाच्या 2 मे रोजी म्हणजेच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी दीपिकाने ती गरोदर असल्याची बातमी दिली होती. तसंच तीचे बेबीबंपसह फोटासुद्धा सोशल मीडियावर शेअर केले होते. दीपिकाने तीचा प्रेग्‍नेंसी पीरीयडही खूप एन्जॉय केला होता. त्याचे फोटो आणि व्हीडीओही सोशल मीडियावर चांगंलेच व्हायरल झाले होते. 
खरंतर दिया और बाती या मालिके दरम्यान दीपिका आणि रोहीत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. काही वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये राहील्यानंतर रोहीत आणि दीपीका यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या प्रमाणे दीपिकाच्या रिल लाईफची चर्चा रंगायची तशीच तीच्या रिअल लाईफचीही तितकीच चर्चा रंगली होती. 
दीपिका आणि रोहीतचं बाळ कसं असणार याबद्दल सध्या दीपिकाच्या फॅन्समध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या बाळाचा सोशल मीडियावर फोटो कधी अपलोड होईल, याकडेही फॅन्सचं लक्ष लागलं आहे.