Join us

दीपिकाचे नवे अवतार

By admin | Updated: July 20, 2014 00:23 IST

दीपिका पदुकोनने तिच्या आजवरच्या चित्रपटांतून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत.

दीपिका पदुकोनने तिच्या आजवरच्या चित्रपटांतून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत. ‘रामलीला’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘कॉकटेल’ यासारख्या चित्रपटांतून तिचे अभिनय कौशल्य संपूर्ण पाहून झाले असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमचा विचार चुकीचा आहे. कारण लवकरच दीपिकाचे अनेक अवतार तिच्या चित्रपटांमधून दिसणार आहेत. आजवरच्या अनेक भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिका निभावताना दीपिका दिसणार आहे. ‘फायडिंग फॅनी’ या चित्रपटात दीपिका गोव्यातील एका मुलीच्या भूमिकेत दिसेल. ‘हॅप्पी न्यू ईअर’मध्ये ती एका मराठी मुलीच्या भूमिकेत आहे, त्याशिवाय ‘तमाशा’, ‘पीकू’ आणि ‘बाजीराव मस्तानी’मध्येही तिचे वेगवेगळे लूक आणि भूमिका पाहायला मिळणार आहेत.