Join us  

डबस्मॅशमुळे मिळाला ईशानला बॅन्जो

By admin | Published: September 24, 2016 1:58 AM

चित्रपटसृष्टीच्या झगमगाटाची भुरळ लाखो-करोडो तरुणांना पडलेली असते.

चित्रपटसृष्टीच्या झगमगाटाची भुरळ लाखो-करोडो तरुणांना पडलेली असते. या स्वप्ननगरीत आपले नशीब आजमाविण्यासाठी किती तरी जण दर दिवशी या चंदेरी दुनियेत येत असतात. पण, म्हणतात ना तकदीर के आगे कुछ नही चलता, तसेच काही झाले आहे ईशान खोपकर या चिमुकल्यासोबत. ईशानला थेट चित्रपट मिळाला तोही बॉलिवूडचा. रितेश देशमुखच्या ‘बॅन्जो’ची चर्चा बॉलिवूडमध्ये चांगलीच रंगू लागली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला निर्माते अमेय खोपकर यांचा मुलगा ईशानचा अभिनय पाहायला मिळणार आहे. खरी गंमत तर पुढे आहे, ईशानला हा चित्रपट मिळाला, पण तो काही आॅडिशन देऊन नाही. तर दिग्दर्शक रवी जाधव यांनी फेसबुकवर ईशानचे काही डबस्मॅश पाहिले होते व ते त्यांना एवढे आवडले, की दिग्दर्शकांनी लगेचच ईशानच्या वडिलांना फोन करुन ईशानला बॅन्जो या चित्रपटात घ्यायची इच्छा व्यक्त केली. ईशानला याविषयी विचारण्यात आले, अभ्यास सांभाळून जर तू करू शकत असशील, तर नक्कीच कर, असे त्याला सांगण्यात आले. ईशानलाही चित्रपटात काम करायचे होते, त्याने लगेचच होकार दिला. शाळा, अभ्यास सांभाळत मग बॅन्जोच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. एवढेच नाही, तर महानायक अमिताभ बच्चन यांनीही ईशानला अभिनयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.