Join us  

‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपमधील जोडपी!

By admin | Published: June 25, 2017 2:52 AM

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हा विषय बॉलिवूडसाठी कॉमन झालाय. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे भारतीय संस्कृतीला डावलून स्वैराचार अंगीकारण्याप्रमाणे आहे, असे अनेकांचे म्हणणे असते.

- अबोली कुलकर्णी‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हा विषय बॉलिवूडसाठी कॉमन झालाय. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे भारतीय संस्कृतीला डावलून स्वैराचार अंगीकारण्याप्रमाणे आहे, असे अनेकांचे म्हणणे असते. मात्र, तरीही या सर्व समजुती आणि परंपरांना नाकारून बॉलिवूडचे अनेक कपल ‘लिव्ह-इन’मध्ये राहिले आहेत. ‘लिव्ह-इन’मुळे अनेक चांगली जोडपी एकत्र आली, तर अनेक दुरावली. पाहूयात, मग या ‘लिव्ह-इन’मुळे क ोणकोणती नाती अजूनही घट्ट आहेत आणि कोणती एकमेकांपासून दूर गेलीत.आमिर खान आणि किरण रावबॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांनी केवळ एक अनुभव म्हणून ‘लिव्ह-इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. लिव्ह इनमध्ये त्या दोघांचीही मनं जुळली आणि त्यांनी एकत्र राहण्याचे ठरवले. सैफ अली खान आणि करिना कपूर ‘द रॉयल कपल’ सैफ अली खान आणि करिना कपूर खान हे जोडपं ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपमुळेच एकत्र आले. पुढे ते एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले. करिना ही नेहमीच सैफ अली खानसोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल गंभीर होती. लग्नाच्याअगोदर करिनाला ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपचा अनुभव घ्यायचा होता. तिने सर्व कपल्सला हेच सांगितले की, ‘मॉडर्न कपल्सनी या रिलेशनशिपचा अनुभव नक्की घ्यावा.’ कुणाल खेमू आणि सोहा अली खानबहीण भावाच्याच पाऊलावर पाऊल ठेवते, यानुसार सैफ अली खान ज्याप्रमाणे करिनासोबत लिव्ह इनमध्ये राहिला होता. तशीच सोहा अली खान हिने देखील तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड कुणाल खेमूसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. एकत्र राहिल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेएका टीव्ही मालिकेच्या सेटवर सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे हे कलाकार एकमेकांच्या पे्रमात पडले. तेव्हापासून त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. त्यांनी एकत्र लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. नशिबाने त्यांचे आईवडीलही त्यांच्या या निर्णयात त्यांच्यासोबत होते. मात्र, काही वर्षांच्या लिव्ह इननंतर आता ते एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.