Join us

सेलिब्रिटींचे ‘सोशल’ फंडे

By admin | Updated: August 9, 2015 00:02 IST

सोशल मीडियाचा हल्ली इतका बोलबाला आहे की, फिल्म स्टार्ससाठी हे माध्यम जणू आॅनलाइन चॅनेल्सच बनले आहे. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहायचे असेल वा आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी

सोशल मीडियाचा हल्ली इतका बोलबाला आहे की, फिल्म स्टार्ससाठी हे माध्यम जणू आॅनलाइन चॅनेल्सच बनले आहे. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहायचे असेल वा आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे अवलंबायचे असतील तर अशा ब्रँडिंगसाठी आॅनलाइन स्टेटसचा वापर आता कॉमन झाला आहे. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार शाहरूख खानने फेसबुकवर ‘अ डे इन द लाइन आॅफ शाहरूख’ या नावाने पोस्ट केले, ज्याला त्याच्या लाखो चाहत्यांनी लाइक केले. आॅनलाइन ग्रुप टीव्हीएफने नुकतेच ‘बँगिस्तान’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगळा प्रयोग केला, ज्याला अनेकांनी पसंत केले. चित्रपट तारकांच्या अशा आॅनलाइन प्रमोशन कॅम्पेनवरचा हा एक वृत्तांत.राधिकाचे आॅनलाइन स्टेटसअभिनेत्री राधिका आपटे हल्ली बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झालीय. तिची चर्चा अभिनयापेक्षा आॅनलाइन व्हिडीओमुळे अधिक आहे. नुकतीच सुजॉय घोष यांच्या ‘अहल्या’ या आॅनलाइन शॉर्ट फिल्ममध्ये तिच्या कामाची खूप चर्चा होत आहे. एका व्हिडीओमध्ये ती खूप बोल्ड अवतारात दिसली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटाचा हा सीन होता. हा व्हिडीओ कोणी बाहेर आणला हे माहिती नसले तरी यामुळे राधिका खूप चर्चेत आली.धनुषचे कोलावरी डीकाही वर्षांपूर्वी ‘रांझना’ फेम धनुष हा ‘कोलावरी डी’ गीत गाऊन चर्चेत आला होता. एका रात्रीत हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि याचा फायदा त्याच्या ‘रांझना’ चित्रपटालाही झाला. एआयबीसोबत इरफानचे पार्टी साँगवेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे चर्चेत राहणाऱ्या एआयबी रोस्टद्वारा रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्याबरोबर करण जोहर हा फ्री स्टाईल शब्दाचा वापर करताना दिसून आला. अभिनेता इरफान खान हासुद्धा एआयबीच्या कॅम्पमध्ये सामील झालाय. एआयबी स्टाईलमध्ये त्याने पार्टी साँग तयार केलंय. दीपिकाचे ‘माय चॉइस’अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली बिनधास्तपणे आपले विचार मांडले. तिने आपल्या स्वतंत्रतेला ‘माय चॉइस’ हे नाव दिले. व्हिडीओमध्ये तिने म्हटले होते की, ही तिची मर्जी आहे, लग्नापूर्वी संबंध ठेवावे अथवा न ठेवावेत. या व्हिडीओने दीपिकाचा नवा सोशल स्टेटस तयार झाला होता.डबस्मॅश ट्रिकडबस्मॅश हे अ‍ॅप चित्रपट तारकांचा अड्डाच बनला आहे. कोणाच्या तरी आवाजात स्वत:ला डबस्मॅशवर झळकावण्याची स्पर्धा सिने तारकांमध्ये लागलीय. यामध्ये रणवीर सिंह, अर्जुन कपूर, सलमान खान यांचा समावेश आहे.