आजवर आपण हिंदी सिनेमा, मराठी सिनेमांच्या सक्सेस पार्टी पाहिल्यात. बॉक्स आॅफिसवर मिळालेल्या यशानंतर सिनेमाची स्टार मंडळी आणि त्यांच्या मित्रांची जंगी पार्टी रंगते; मात्र हाच ट्रेंड आता मराठी नाट्यसृष्टीत रुळू लागलाय. नुकतंच सोनल प्रॉडक्शन्सच्या नाटकांच्या यशाचं सेलीब्रेशन करण्यासाठी खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. गोष्ट तशी गंमतीची, ‘डोन्ट वरी बी हॅपी’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘अखियों के झरोखो से’ या नाटकांचं यश साजरं करण्यासाठी मराठी तारे अवतरले होते. या वेळी या तारकांचा खास ड्रेसिंग अंदाज लक्षवेधी ठरला. अभिनेत्री अमृता सुभाष, रमन राघव 2.0 या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एंट्री मारलेल्या अभिनेत्री अमृता सुभाषसाठी हा सोहळा जणू दुग्धशर्करा योग होता. बॉलीवूडची एंट्री आणि परफेक्ट मिसमॅच नाटकाचं सेलीब्रेशन हा योग जुळून आला. त्यामुळे अमृतासुद्धा खास पिवळ्या रंगाच्या आकर्षक वनपिसमध्ये पाहायला मिळाली. नेहमी स्मित हास्य असणाऱ्या अमृताचा चेहरा या पिवळ्या रंगाच्या टॉपवर आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळाला. तर सोनल प्रॉडक्शन्सच्या ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकात झळकलेली अभिनेत्री स्पृहा जोशीसुद्धा आपल्या नाटकाचं यश साजरं करण्यासाठी काहीशा अनोख्या अंदाजात अवतरली. फुल स्लिव्हसचा निळ्या रंगाचा शायनिंग टॉप आणि स्कर्ट स्पृहाच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता. सोबतच कानातले आकर्षक झुमके आणि घड्याळही तितकंच खुलून दिसत होतं. तर उमेश कामत-प्रिया बापट ‘डोन्ट वरी बी हॅपी’ या नाटकाचं यश सेलीब्रेट करण्यासाठी अभिनेता उमेश कामत पत्नीसह या पार्टीला उपस्थित होता. या पती-पत्नीचा खास ड्रेसिंग अंदाज उपस्थितांच्या नजरा आकर्षित करीत होता. निळ्या रंगाचा ओपन शर्ट, पांढरा टी-शर्ट आणि जीन्स अशा रॉकिंग अवतारात उमेश कामत या पार्टीत हजर होता.. तर त्याची पत्नी प्रिया बापटचा अंदाजही तितकाच ग्लॅमरस होता. गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस टॉप आणि काळ्या रंगाचे कानातले झुमके लक्षवेधी ठरले. हॉलिवूड, बॉलिवूड, टीव्ही अन् मराठी चित्रसृष्टीच्या रंजक बातम्या व गॉसिप वाचण्यासाठी लॉगइन करा ६६६.ूल्ल७्िरॅ्र३ं’.ूङ्मे
नाटकांच्या यशाचं सेलिब्रेशन
By admin | Updated: June 27, 2016 00:31 IST