Join us

श्रद्धा कपूर दिसली फॅमिलीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या कुटुंबासोबत दिसली. मुंबईतल्या जुहुमधल्या एका मार्गाला श्रद्धा कपूरच्या आजोबांचे म्हणजेच पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव देण्यात आले. याप्रसंगी श्रद्धा कपूरचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या कुटुंबासोबत दिसली. मुंबईतल्या जुहुमधल्या एका मार्गाला श्रद्धा कपूरच्या आजोबांचे म्हणजेच पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव देण्यात आले. याप्रसंगी श्रद्धा कपूरचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं.पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते.जेष्ठ गायिका आशा भोसले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मार्गाचे उद्धाटन करण्यात आले.आशा भोसले आणि रश्मि ठाकरे हास्यविनोद करतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.श्रद्धा कपूर ट्रॅडिंशनल लूकमध्ये दिसली.पद्ममिनी कोल्हापूरी साडी खूपच सुंदर दिसत होती.ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र ही याठिकाणी उपस्थिती दिसले.श्रद्धा कपूर आणि आशा भोसले यांची नात जनाई भोसले कॅमेरासमोर पोझ देताना.