Join us  

शरद केळकरच्या पत्नीने शेअर केला लग्नातला फोटो, दोघेही दिसतात खूपच क्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 3:32 PM

शरद आणि कीर्ती दोघेही या फोटोत खूपच क्यूट दिसत असल्याचे त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावरील कमेंटद्वारे सांगत आहेत.

ठळक मुद्दे२००५ मध्ये शरदने कीर्तीशी लग्न केले. त्यांना मुलगी असून तिचे नाव किशा आहे.

शरद केऴकरची पत्नी कीर्ती केळकरने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण लग्न झाल्यापासून ती मालिकांपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिने नुकताच तिच्या लग्नातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शरद आणि कीर्ती दोघेही या फोटोत खूपच क्यूट दिसत असल्याचे त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावरील कमेंटद्वारे सांगत आहेत. शरद आणि कीर्ती यांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने झाले होते. कीर्तीने शेअर केलेल्या या फोटोत शरद तिच्याकडे पाहाताना दिसत आहे. त्यामुळे फोटोसोबत ऐसे ना देखो... अशी कॅप्शन तिने लिहिली आहे. 

२००५ मध्ये शरदने कीर्तीशी लग्न केले. त्यांना मुलगी असून तिचे नाव किशा आहे. कीर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कीर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले आहे. नच बलिए या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही तिला आपण पाहिले आहे.

छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा, मराठी सिनेमा असो किंवा मग बॉलिवूड या सगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने शरद केळकरने रसिकांची पसंती मिळवली आहे. आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे त्याने आपली छाप रसिकांवर पाडली आहे. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद झळकला होता. त्याने साकारलेल्या या भूमिकेने तर रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. सर्वच स्थरावरून त्याच्या भूमिकेचे त्याच्या कामाचे कौतुक झाले. त्यामुळे नक्कीच ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमा शरद केळकरसाठी एक टर्निंग पॉइंट ठरला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

टॅग्स :शरद केळकर