Join us  

अश्लील मेसेजना कंटाळून कधी काळी सपना चौधरीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, आता या व्यक्तीसोबत केले आहे लग्न

By गीतांजली | Published: October 08, 2020 12:25 PM

खूप लहान वयात तिच्या खांद्यावर घराची जबाबदारी आली.

आपल्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्सने लोकांना वेड लावणारी सपना चौधरीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनाता पती वीर साहूने मंगळवारी फेसबुक लाव्हच्या माध्यमातून ही खुशखबर सांगितली. याच वर्षी जानेवारीमध्ये सपनाने वीर साहूसोबत सीक्रेट मॅरेज केले. सपना आणि साहू जवळपास 4 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. 

सपना चौधरी आज एक मोठे नाव आहे. बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर सपनाच्या फॅन्समध्ये आणखी वाढ झाली. सपना चौधरी आज लग्झरीस लाईफस्टाईल जगते. मात्र सपनाला कधीच डान्सर होण्याची इच्छा नव्हती, सपनाला इन्सपेक्टर व्हायचे होते मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला शिक्षण सोडावे लागले. 

2008ला सपनाच्या वडिलांचे निधन झाले आणि खूप लहान वयात तिच्या खांद्यावर घराची जबाबदारी आली. घर चालवण्यासाठी सपना डान्स करु लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार एकवेळी अशी होती जेव्हा सपनाला दररोज  अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज यायाचे. याला कंटाळून सपना आत्महत्या करणार होती. 

कोण आहे वीर साहू? वीर साहू हा एक हरियाणवी सिंगर आहे. शिवाय एक अ‍ॅक्टरही आहे. हरियाणात तो प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये तो गातांना व अभिनय करताना दिसला आहे. सिंगींग व अ‍ॅक्टिंगसाठी त्याने त्याची एमबीबीएसचे शिक्षण सोडले होते. त्याचे पहिले गाणे ‘थाड्डी बड्डी’ तुफान गाजले होते. पंजाबी सिनेमा ‘गांधी फिर आ गए’मध्ये त्याने काम केले होते.

 

म्हणून सपना चौधरीने लपवली लग्नाची गोष्ट; डिसेंबरमध्ये वैदिक विवाह, जानेवारीत केले कोर्टमॅरेज

PHOTOS: कधी काळी ३१०० रुपयांसाठी डान्स करणारी सपना चौधरी आता आहे कोट्यवधींची मालकीण

 

टॅग्स :सपना चौधरी