Join us  

नाही सापडले जुही चावलाचे हरवलेले हिऱ्याचे कानातले, ट्विटरवर यूजर्स म्हणाले- सीबीआई को बुलाओ

By गीतांजली | Published: December 15, 2020 3:32 PM

सोशल मीडियावर यूजर्स जूही चावलाला ट्रोल केलं जातंय.

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाचे सध्या तिच्या मुंबई एअरपोर्टवरुन हरवलेल्या डायमंडच्या ईअररिंग्सला घेऊन चर्चेत आहे. आतापर्यंत पोलिसांना अभिनेत्रीची हरवलेली रिंग्स अद्याप सापडलेली नाही. मात्र सोशल मीडियावर यूजर्स जूही चावला ट्रोल करतायेत.  

कोणी माझी मदत केली तर मला खरंच खूप आनंद होईल. कृपया ते शोधण्यामध्ये माझी मदत करा. कानालते सापडले तर कृपया पोलिसांना माहिती द्या. शोधणा-यास बक्षीस दिले जाईल. हे माझे मॅचिंग पीस आहे. 15 वर्षांपासून मी ती घालते आहे. प्लीज शोधण्यासाठी मदत करा,’ असे ट्विट जुहीने केलं होतं म्हटले आहे.

जोनल डीसीपी मंजुनाथ सिंगने यांनी सांगितले की पोलिस त्या ईअररिंग्सच्या शोधात आहेत पण अजून त्याबाबत काही माहिती मिळालेली नाही, मात्र CISFला सूचना देण्यात आली आहे. 

सोशल मीडियावर यूर्जस जुहीच्या पोस्टची खिल्ली उडवतायेत. काहींनी लिहिले, सीबीआयला बोलवा, SSRची केस तर सोल्व नाही झाली, तुझे ईअररिंग्स शोधण्याच्या लायकच आहेत ते. 

एका यूजरने लिहिले, काळजी करू नका, आनंदी रहा. एकतर ते आपल्याकडे परत येईल किंवा एखाद्याचे कर्ज फिटेल. 

 

एकाने जुहीचा रडण्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, आपल्याला लवकरच ते मिळावा अशी मी प्रार्थना करतो आहे.

जुहीने हिऱ्याच्या कानातल्याचा फोटोही शेअर केला आहे. रविवारी सकाळी मी मुंबई एअरपोर्टच्या गेट नंबर 8 मधून जात होते. Emirates Counter वर मी चेक-इन केले. सिक्युरिटी चेकिंग झाली, पण यादरम्यान माझे हिऱ्याचे कानातले कुठेतरी पडले. असं तिने या कानातल्याच्या फोटोसोबत लिहिले आहे.  

टॅग्स :जुही चावला