Join us  

'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग संपल्यावर भावूक झाली करिना कपूर, आमिर खानने घेतली तिची अशी फिरकी

By गीतांजली | Published: October 16, 2020 6:23 PM

करिना कपूर खानने नुकतेच 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण केले आहे.

करिना कपूर खानने नुकतेच 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर बेबा इमोशनल झाली आणि तिने इन्स्टाग्रामवर एक भावूक नोट लिहिली. यावर आमीर खानने रंजक उत्तर दिले आहे.  आमिर खानने करीना कपूरची पोस्ट रिपोस्ट करते लिहिले, काय बोलतेस तू हे करिना ? अजून प्रवास संपला कुठे ? अजिबात नाही. मी अव्दैतला सांगितले आहे की आपले अजून काही सीन्स लिही, म्हणजेच तुझ्यासोबतच शूटिंग आम्ही सुरु ठेवू. 

करिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, मी लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले. कठीण काळ होता मी प्रेग्नेंन्सी, भीती, मात्र यासगळ्या गोष्टी माझ्या ध्येयाला थांबवू शकल्या नाहीत. मी शूटिंग पूर्ण केले. सर्व काळजी घेत. आमिर खान आणि अव्दैत चंदन यांचे आभार. धन्यवाद टीम.. 

लॉकडाऊन दरम्यान करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे ती अशा अवस्थेत राहिलेले शूटिंग कसं पूर्ण करेल असा प्रश्न पडला होता. करिनाने सर्व आवश्यक नियमांचे पालन करत शूट केले. विशेष म्हणजे, करिनाची प्रेग्नेंन्सी लक्षात घेत शूटिंग दरम्यान सावधगिरी बाळगत सुरक्षेच्या नियामांची काळजी घेतली गेली. 

सिनेमाची कथाकरिनासोबत या सिनेमाची शूटिंग आमिर खान करत होता. 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. आधी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :करिना कपूरआमिर खान