Join us  

या कारणामुळे सलमान खान कधीच देत नाही चित्रपटांमध्ये किसिंग सीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:53 PM

सलमान कोणताही चित्रपट साईन करण्याआधीच तो चित्रपटात किसिंग सीन देणार नाही याविषयी स्पष्ट करतो. त्याची ही अट निर्मात्यांना मान्य असेल तरच तो चित्रपटामध्ये काम करण्यास होकार देतो.

ठळक मुद्देसलमानने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच तो कधी कोणत्या चित्रपटात किसिंग सीन देणार नाही असे त्याने ठरवले होते. सलमान हा आयुष्यात कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याच्या कुटुंबाला सगळ्यात जास्त महत्त्व देतो.

सलमान खानने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण त्याच्या चित्रपटांचे तुम्हाला वैशिष्ट्य माहितेय का, सलमान कधीच त्याच्या चित्रपटांमध्ये किसिंग सीन देत नाही. सलमान कोणताही चित्रपट साईन करण्याआधीच तो चित्रपटात किसिंग सीन देणार नाही याविषयी स्पष्ट करतो. त्याची ही अट निर्मात्यांना मान्य असेल तरच तो चित्रपटामध्ये काम करण्यास होकार देतो. 

आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार हे आज सलमानप्रमाणेच आघाडीचे अभिनेते आहेत. पण सलमान व्यक्तिरिक्त कोणताही कलाकार अशाप्रकारची अट ठेवत नाही. सलमानने त्याच्या कारकिर्दीत आजवर अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पण कधीही चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन देताना त्याने त्याची सीमा ओलांडली नाही. सलमान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या या अटीविषयी माहीत असते. 

मैंने प्यार कियाा या चित्रपटात सलमानने भाग्यश्रीसोबत किसिंग सीन द्यावा असे दिग्दर्शक सुरज बडजात्या यांना वाटत होते. पण काही केल्या यासाठी सलमान आणि भाग्यश्री तयार झाले नाहीत. अखेरीस सलमान एका काचेवर किस करतो असे चित्रपटात दाखवण्यात आले होते. 

सलमानने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच तो कधी कोणत्या चित्रपटात किसिंग सीन देणार नाही असे त्याने ठरवले होते. सलमान हा आयुष्यात कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याच्या कुटुंबाला सगळ्यात जास्त महत्त्व देतो. त्याच्यामते कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाचे असते. त्यामुळेच त्याचा कोणताही चित्रपट लोकांनी आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहून पाहावा असे सलमानला वाटते आणि त्याचमुळे सलमानने चित्रपटात किसिंग सीन न देण्याचे ठरवले होते. 

सलमान खानने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमानच्या वॉटेंड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर या चित्रपटांनी २०० कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. सलमान लोकांच्या हृदयावर राज्य करतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सलमानची लोकप्रियता प्रचंड असून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. बिग बॉस कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन देखील त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

टॅग्स :सलमान खान