Join us  

या दिवशी प्रदर्शित होणार द फॅमिली मॅन २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 5:13 PM

द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सिझनची घोषणा झाल्यानंतर ही वेबसिरिज कधी सुरू होणार याची लोक वाट पाहात आहेत.

ठळक मुद्देही वेबसिरिज १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ही वेबसिरिज हिंदीसोबतच भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये डब केली जाणार आहे.

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरिजला सप्टेंबरमध्ये एक वर्षं पूर्ण झाल्यानंतर द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची दमदार अंदाजात घोषणा केली होती. दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री समांथा अक्किनेनीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसिरिजच्या निमित्ताने ती डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे.

द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सिझनची घोषणा झाल्यानंतर ही वेबसिरिज कधी सुरू होणार याची लोक वाट पाहात आहेत. ही वेबसिरिज १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ही वेबसिरिज हिंदीसोबतच भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये डब केली जाणार आहे. तसेच अनेक विदेशी भाषांमध्ये देखील ही वेबसिरिज डब करण्यात येणार आहे.

द फॅमिली मॅन वेबसीरिजमधून मनोज वाजपेयीने डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते. यात त्याने श्रीकांत तिवारीची भूमिका साकारली होती. तो एक सीक्रेट एजेंट आहे. त्याच्या घरातल्यांसाठी तो एक सामान्य व्यक्ती आहे. तो काय काम करतो हे त्याच्या घरातल्यांना देखील माहीत नाहीये. 

या वेबसिरिजमध्ये  मनोज वाजपेयीसोबत शारीब हाश्मी, नीरज माधव, प्रियामणी, शरद केळकर आणि गुल पनाग हे कलाकार आहेत.

टॅग्स :मनोज वाजपेयी