Join us  

EUREKHA या पुस्तकात लेखकाने केले आहे नमूद, रेखाचे आहेत आपल्या सेक्रेटरीसोबत समलैंगिक संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:59 AM

बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींमध्ये रेखा यांची गणना केली जाते. पण असे असूनही रेखा आजही एकट्याच राहातात. रेखा यांचे आयुष्य नेहमीच विवादात राहिले आहे.

रेखा यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींमध्ये रेखा यांची गणना केली जाते. पण असे असूनही रेखा आजही एकट्याच राहातात. रेखा यांचे आयुष्य नेहमीच विवादात राहिले आहे. त्यांच्या आयुष्याविषयी धक्कादायक खुलासे EUREKHA या पुस्तकात करण्यात आले होते. प्रसिद्ध पत्रकार मोहनदीप यांनी रेखा यांच्यावर 'EUREKHA' नावाचे पुस्तक लिहीले आहे. त्यात त्यांनी रेखाच्या सेक्शुअल लाइफविषयी नमूद केले आहे. त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे की, रेखा आणि फरजाना यांच्यामध्ये सेक्शुअल रिलेशन आहेत. मोहनदीप यांनी या पुस्तकात असेही लिहीले आहे की, रेखाचे पती मुकेश अग्रवालने याच कारणामुळे आत्महत्या केली होती. या पुस्तकात रेखा आणि फरजाना यांच्याबद्दल अनेक गोष्टी लिहील्या असल्या तरी रेखा यांनी त्यावर कोणतेही कमेंट कधीच केले नाही.रेखा फरजानाला त्यांच्या सोल सिस्टर असल्याचे सांगतात. फरजाना यांना कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. फरजाना या गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून रेखा यांच्यासोबत आहेत. त्या सुरुवातीला त्यांच्या हेअर स्टायलिस्ट होत्या. पण आता गेल्या कित्येक वर्षांपासून त्या रेखा यांच्या सेक्रेटरी आहेत. फरजाना आज रेखा यांच्या सर्वात जवळची व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. मोहनदीप यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते चांगलेच वादग्रस्त ठरले होते. रेखाच्या फॅन्सना तर यामुळे चांगलाच धक्का बसला होता. दक्षिण भारतीय अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेल्या रेखा यांनी बॉलिवूड मध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. रेखा यांचे मूळ नाव भानुरेखा असले तरी सिनेसृष्टी मध्ये येण्यासाठी त्यांनी रेखा हे नाव धारण केले. १९७० मध्ये आलेला सावन भादो हा त्यांचा पहिला चित्रपट होता.  खुबसूरत, खून भरी मांग, उमराव जान, घर, सिलसिला, मुक्कदर का सिकंदर अशा एकाहून एक सरस चित्रपटांत त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :रेखा