Join us  

फॅशन चार्टसवर ‘या’ अभिनेत्री ठरल्या अपयशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 6:57 PM

फॅशन, स्टाईल, स्टेटमेंट यांच्यामध्ये प्रत्येक सेलिब्रिटी हा अग्रेसर असतो. पण, कधीतरी असंही होतं की, त्यांचा फॅशन सेंस चाहत्यांना आवडत नाही. तसेच फॅशन चार्ट्समध्येही त्यांचे नाव निवडले जात नाही.

बॉलिवूड हे ग्लॅमरस क्षेत्र असलं तरी पण कोणता सेलिब्रिटी कधी भाव खाऊन जाईल काहीच सांगता येत नाही. फॅशन, स्टाईल, स्टेटमेंट यांच्यामध्ये प्रत्येक सेलिब्रिटी हा अग्रेसर असतो. पण, कधीतरी असंही होतं की, त्यांचा फॅशन सेंस चाहत्यांना आवडत नाही. तसेच फॅशन चार्ट्समध्येही त्यांचे नाव निवडले जात नाही.  यंदाही बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा आहेत ज्या फॅशन चार्ट्सवर अपयशी ठरल्या. कोण आहेत त्या? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल..आम्ही सांगतो त्या अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंग, भूमी पेडणेकर, कृती सॅनन, राधिका मदन या अभिनेत्री अपयशी ठरल्या आहेत.

रकुल प्रीत सिंग‘मरजावाँ’ ट्रेलर लाँचसाठी तान्या घावरी या स्टायलिस्टने एक ड्रेस डिझाईन केला होता. जो रकुलने घातला आणि त्यावरच तिने रॅम्पवॉक करत तिची मोहिनी उपस्थितांवर टाकली. पण, ती फॅशन चार्ट्समध्ये तिची निवड झाली नाही. ती यंदाच्या फॅशन चार्ट्सवर अपयशी ठरली.

राधिका मदनछोटया पडद्यावरची गॉर्जिअस अभिनेत्री म्हणजे राधिका मदन. तिने फॅशन वीकदरम्यान एक वेल डिझाईन आऊटफिट परिधान केला होता. ब्राईट कलरमधील तो गाऊन असल्याने तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. मात्र, काही अंशी ती चाहत्यांच्या पसंतीस उतरली नाही.

भूमी पेडणेकर‘साँड की आँख’ या आगामी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. तिने या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी घातलेला ड्रेस काही अंशी निराश करणारा होता. तिचे फुटविअर, मेकअप आणि हेअरस्टाईल हे सगळेच खूप आकर्षक होते. पण, तिच्या आऊटफिटमध्ये उठावदारपणे दिसणारा जांभळया रंगाचा पॅच हा निराश करणारा होता. त्यामुळे तिची या यादीत पिछेहाट झाली.

क्रिती सॅननबॉलिवूडच्या सध्याच्या गॉर्जिअस अभिनेत्रींपैकी एक म्हणून क्रितीला मानले जाते. मात्र, तिने फॅशन वीकमध्ये परिधान केलेला हलक्या रंगाचा जांभळा रंग चाहत्यांना फारसा आवडला नाही. तिचा मेकअप मोहक होता पण, क्रितीच्या आऊटफिटमुळे तिची फॅशन चार्ट्सवर निराशा झाली.                              

टॅग्स :क्रिती सनॉनभूमी पेडणेकर