Join us  

OMG! व्हिसाशिवाय विवेक ऑबेरॉय पोहोचला दुबईला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:31 PM

विवेक एका कामासाठी नुकताच दुबईला गेला होता. पण तिथे गेल्यानंतर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कारण तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की, त्याच्याकडे व्हिसाच नाहीये.

ठळक मुद्देमी दुबईला पोहोचल्यावर माझ्या लक्षात आले की, मी माझा व्हिसा भारतात विसरलो आहे. तसेच माझ्या मोबाईलमध्ये व्हिसाची डिजिटल कॉपी देखील नाहीये. मी खूप मोठा गोंधळ घातलेला आहे हे मला कळले होते.

विवेक ऑबेरॉयने त्याच्या आयुष्यातील एक किस्सा त्याने नुकताच सांगितला आहे. तो त्याच्या एका कामासाठी नुकताच दुबईला गेला होता. पण तिथे गेल्यानंतर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कारण तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की, त्याच्याकडे व्हिसाच नाहीये. पण काही अधिकाऱ्यांनी त्याला मदत केल्यामुळे या अडचणींतून त्याला बाहेर पडता आले. त्याने या घटनेविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्याने या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. 

या व्हिडिओत विवेक बोलताना दिसत आहे की, मी दुबईला माझ्या एका कामासाठी गेलो होतो. तिथे माझ्यासोबत घडलेली घटना मी तुमच्यासोबत शेअर करावी असे मला वाटते. मी दुबईला पोहोचल्यावर माझ्या लक्षात आले की, मी माझा व्हिसा भारतात विसरलो आहे. तसेच माझ्या मोबाईलमध्ये व्हिसाची डिजिटल कॉपी देखील नाहीये. मी खूप मोठा गोंधळ घातलेला आहे हे मला कळले होते. काय करू हे मला काहीच सुचत नव्हते. खरे तर तुम्ही दुबईला पोहोचल्यावरदेखील व्हिसा काढू शकता. पण मी भारतात असताना व्हिसा घेतला असल्याने माझा व्हिसा दुबईतून होऊ शकणार नाही याची मला खात्री होती. या सगळ्यात काय करू मला कळत नव्हते. पण दुबईतील काही मंडळींनी मला या संकटातून बाहेर पडण्यास मदत केली. तेथील इमिग्रेशन कंट्रोल, तसेच पासपोर्ट अधिकाऱ्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांनी मला खूपच मदत केली. तिथे एक महिला अधिकारी होत्या, त्या मला एअरपोर्टवरील विविध विभागांमध्ये घेऊन गेल्या आणि तिथे आवश्यक असणाऱ्या सगळ्या तरतुदी त्यांनी पूर्ण केल्या. मला मदत केल्याबद्दल मी दुबई एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच माझा हा प्रवास सुखकर झाला. 

 

टॅग्स :विवेक ऑबेरॉय